सनातन भारतीय जीवनशैलीनं सर्वांना एकत्र घेऊन वाटचाल करत एक आदर्श निर्माण केला आहे, आणि एकाच धाग्यात सर्वांना बांधल्यामुळे विविधता असूनही देश अखंड राहिला आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तिरुपती इथल्या आंतरराष्ट्रीय मंदीर संमेलनात ते आज बोलत होते.
भारतीय सनातन जीवनपध्दती शाश्वत असून तिला कोणीही मिटवू शकणार नाही, या जीवनपध्दतीचंच रुप आपल्याला महाकुंभात दिसत आहे,असं ते म्हणाले. मंदीरं आपल्याला प्रेरणा देतात, ती केवळ श्रध्दास्थानं नाहीत, तर समाजजीवनाचं अंग आहे,आपल्या इतिहास आणि स्थापत्यशास्त्राचं दर्शन देणारे आहेत, असं ते म्हणाले. छत्रपती शिवरायांच्या नंतर अहिल्याबाई होळकरांनी मंदीर पुनरुज्जीवनाचं काम केलं, आज देशात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सांस्कृतिक पुनरुत्थानाचा यज्ञ सुरु आहे, असं फडणवीस म्हणाले.