Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

मोहने टिटवाळा परिसराच्या विकासासाठी आपण सदैव कटीबद्ध - माजी आमदार नरेंद्र पवार

गाळेगाव परिसरातील विविध विकासकामांचे भूमीपूजन

कल्याण दि.27 फेब्रुवारी : मोहने आणि टिटवाळा परिसराच्या विकासासाठी आपण सदैव कटीबद्ध असल्याचे अभिवचन कल्याण पश्चिम मतदारसंघाचे माजी भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी दिले. नरेंद्र पवार यांच्या विशेष प्रयत्नाने महाराष्ट्राचे माजी राज्यसभा खासदार व्हि. मुरलीधरन यांच्या खासदार निधीतून येथील गाळेगाव परिसरात विविध विकासकामांचे भूमीपूजन संपन्न झाले. त्यावेळी उपस्थित नागरिकांशी ते संवाद साधत होते.


येत्या काळात कल्याण विधानसभा मतदारसंघात आणि मतदारसंघ परिसरात आजच्या घडीला अनेक महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. काही कामे ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत तर काही राज्य सरकारमार्फत सुरू असून यामुळे कल्याण आणि आसपासच्या परिसराला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. मुंबईतून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कोणत्याची भागात जाण्यासाठीची आवश्यक असणारी रस्ते कनेक्टीव्हिटी कल्याणच्या आसपास उभी राहत असल्याचे नरेंद्र पवार यांनी अधोरेखित केले. तसेच त्यामुळे तिसरी मुंबई म्हणून हा सर्व परिसर नावारूपाला येणार असून त्यामध्ये मोहने आणि टिटवाळा परिसराचे महत्त्वाचे योगदान असणार आहे. या पार्श्वभूमीवर या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू असा विश्वास माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी उपस्थितांशी बोलताना व्यक्त केला. राज्यसभेचे माजी खासदार व्ही. मुरलीधरन यांच्या खासदार निधीतून गाळेगांव परिसरात अंतर्गत रस्ते आणि झाकणासह गटार बांधकाम या विकासकामांचे आज भूमिपूजन करण्यात झाले.


या कार्यक्रमप्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, भाजपा मोहने टिटवाळा मंडल अध्यक्ष शक्तीवान भोईर, माजी नगरसेवक जनार्दन पाटील, अनंता पाटील, अपर्णा पाटील, संतोष शिंगोळे, रमेश कोनकर, अनंता पाटील, मोहन कोनकर, सतिश पाटील, भूषण मिश्रा, मुकेशकुमार कनोजिया, विजय पाटील, रामा पाटील, रंजना भामरे, सुरज सुतार तसेच गावातील प्रतिष्ठित-ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी, युवा बांधव, भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Design by - Blogger Templates |