दिवा:- ठाणे महानगर पालिका हद्दीतील बेतवडे येथील रुणवाल माय सिटी येथील दहा बिल्डिंगच्या कॉम्प्लेक्स च्या बाजूला असलेल्या जागेवरती आज दुपारच्या वेळेस आग लागल्याने सोसायटीमध्ये भयभीत वातावरण झाले होते सोसायटीच्या बाजूला पडीत जागा असून यात मोठ्या प्रमाणात गवत असून या गवताला आज दुपारी अचानक आग लागली आगीचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.
सदर माहिती दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांना माहित पडताच तात्काळ घटनास्थळी जाऊन त्यांनी अग्निशमन दलाला प्राचारण केले व अग्निशमन दलाच्या गाड्या येऊन आग विझवण्याचे काम शर्तीने करत आहेत अशी माहिती रोहिदास मुंडे यांनी दिली आहे यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही असे रोहिदास मुंडे यांनी सांगितले आहे.