कल्याण ( संजय कांबळे ) कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायतीच्या वतीने १५व्या वित्त आयोगातून आदिवासी विकास मंडळांना समाज उपयोगी भांडी तसेच ग्रामपंचायत हद्दीतील१२अंगणवाड्यांना ग्रामनिधीतून मुलासाठी विविध खेळाचे साहित्य वाटप सरपंच श्रीम निलिमा नंदू म्हात्रे यांच्या हस्ते आणि सर्व सदस्यांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले.यामुळे मंडळासह नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
म्हारळ ग्रामपंचायत तालुक्यात मोठी ग्रामपंचायत आहे, गावातील आदिवासी मल्हार महादेव कोळी, समाज उन्नती मंडळ व संकल्प आदिवासी मित्र मंडळ यांना१५व्या वित्त आयोगातून समाज उपयोगी जेवणाची भांडी यामध्ये मोठे टोप, शेगडी, बादल्या, कावळे, कालते, ड्रम, इत्यादी भांडयाचा समावेश आहे तर ग्रामपंचायत हद्दीतील१२अंगणवाडयांना विविध खेळाचे साहित्य हे ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून देण्यात आले, या साहित्याचे वाटप नुकतेच म्हारळ ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीम निलिमा नंदू म्हात्रे यांच्या हस्ते आणि इतर ग्रामपंचायतीचे सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी अँड दिपक अहिरे, किशोर वाडेकर, विकास पवार, वेदिका गंभीरराव, अश्विनी देशमुख, मंगला इंगळे, बेबी सांगळे, मोनिका गायकवाड, नंदा म्हात्रे,प्रगती कोंगिरे, अमृता देशमुख, लक्ष्मण कोंगिरे,आणि योगेश देशमुख, व ग्रामपंचायत अधिकारी अमोल मुरबाडे आदी मंडळी उपस्थित होते. यामुळे आदिवासी मित्र मंडळाचे सदस्य तसेच नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले.