ठाणे / शिळफाटा ( विनोद वास्कर ) : संपूर्ण भारतभर चालकांवर अनेक प्रकारे सोषण ,लुटपाट,महामार्गावर पोलिस प्रशासन कडुन विनाकारण आडवुन भल्यामोठ्या पैशाची मागणी ,राज्याच्या सिमेवर बँरेकेटस लाउन गाडी चेकींगच्या नावाखाली पेपरची तपासणीच्या नावाखाली इंट्रीचे पैसे वसुलतात ,नविमुंबईतील शिळफाटा ते महापे रोडवर चेटपोस्टवर दर शनिवारी नविमुंबईत येताना एका गाडी मागे ५० रु. तर जाताना १०० रु ची सर्रास मागणी केली जाते .आर.टी.ओ.पोलिस देखील महामार्गवर आसो की सिटी मधील रस्त्यावर किंवा पार्किंगमध्ये त्यांना वाट्टेल तिथे आपली गाडी उभी करुन चालकांना मुआप ऑनलाइन चलान करतात .
या सगळ्या बाबिंवर ड्रायव्हर सुरक्षा एकता मंचचे अध्यक्ष श्री दिपक गोहिल यांनी सरकारला अनेक प्रकारे आंदोलन करून कळवले यामधील मुख्य आंदोलन म्हणजे दि.१७/०९/२०१९ रोजी पुणे ते दिल्ली १६०० कि.मि.ची सायकल यात्रा परंतु सरकारने या मुख्य मुद्यांवर दुर्लक्ष केले. म्हणून दि.२२/२३ मार्च ला संपूर्ण भारतातील चालकांनी आता केंद्रीय सरकारी दरवाजे ठोठावण्याचे आव्हान केले आहे .
यामध्ये ड्रायव्हर सुरक्षा एकता मंचचे पदाधिकारी पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश गराडे,बबन दिवार नागपूर शहर अध्यक्ष हेमंत नानवटकर ,रफिक शेख युवराज महल्ले.प्रविण गडपाले .यांनी आंदोलनाला पाठींबा देत सरकारने आमचे ऐकून घेतले नाहीतर आमची भुमिका आणखी तिव्र करु असा इशारा दिला आहे.