उरण दि १८ ( विठ्ठल ममताबादे ) : श्रीमंत योगी प्रतिष्ठान वशेणी,केळवणे,तांबडशेत यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून किल्ले रायगड ते तांबडशेत,वशेणी,केळवणे अशी महाराजांची शिवज्योत ह्या तिन्ही गावात मोठ्या उत्साहात आणण्यात आली.
ही शिवज्योत आणण्यासाठी वशेणी गावचे शिवभक्त सुबोध पाटील, तांबडशेतचे कल्पेश म्हात्रे, संकेत पाटील,जयेश पाटील,केळवणेचे रंजित पाटील, गुरुनाथ गावंड, चैतन्य पाटील आदी शिवभक्तांनी ही शिवज्योत आनण्यासाठी खूप प्रयत्न केले.या शिवज्योतीचे प्रत्येक गावागावात उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तीथी प्रमाणे दिनांक १७/०३/२०२५ रोजी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.अशी माहिती पुनाडे गावचे शिवप्रेमी तथा पुनाडे गावाचे सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र आत्माराम पाटील यांनी दिली.