उरण दि १ ( विठ्ठल ममताबादे ) : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सन २०१३ पासून कार्यरत असून यामध्ये ० ते १८ वर्ष वयोगटातील बालक व विद्यार्थी यांची वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणी करण्यात येते. सदर कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी व सर्वसामान्य जनतेमध्ये कार्यक्रमाची प्रसिद्धी होण्यासाठी मा.ना.श्री.प्रकाश अबिटकर, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांचे संकल्पनेतून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम २.० विशेष मोहीम तालुकास्तरीय शुभारंभ सोहळा पी एम श्री रा.जि.प प्राथमिक शाळा, मुळेखंड येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र इतकरे , वैद्यकीय अधीक्षक डॉ.बाबासो काळेल,नगरसेवक राजू ठाकूर , मुखाध्यापक अमृत ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाच्या पुणे येथील राज्यस्तरीय उद्घाटन सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाचे सादरीकरण करण्यात आले. या प्रक्षेपणाच्या वेळी मा.ना.श्री.प्रकाश अबिटकर, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रभावीपणे राबविण्यात येत असून सदर कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करत असलेल्या आरोग्य पथकाचे विशेष कौतुक केले तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम २.० हि विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबविण्याकरिता शुभेच्छा दिल्या. यानुसार रायगड जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम अंतर्गत ०३ मार्च पासून शासकीय व निम शासकीय शाळा, अंगणवाडी मधील बालक व विद्यार्थी यांची आरोग्य तपासणी करून संदर्भ सेवा पुरविण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमासाठी उरण येथील मुळेखंड येथील सरपंच अजय म्हात्रे , आरबीएसके पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ स्वाती म्हात्रे, डॉ प्रणाली म्हात्रे, डॉ निशिकांत सावंत ,अयोग्य सेविका संगीता शिंदे , औषध निर्माता बालाजी शेंबाळे ,आरोग्य सहाय्यक संतोष परदेशी , कुष्ठरोग तंत्रज्ञ रामदास देसले ,आशा गट प्रवर्तक रुपाली पाटील आंगण वाडी सेविका व कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आरबीएसके व डीईआयसी विभाग तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.