विजेत्या संघाला मिळणार बोकड ( बकरा ) व आकर्षक चषक
नवी मुंबई : कोपर खैरणे गावां मध्ये या वर्षी सहयोग मित्र मंडळ आयोजित कै.महेंद्र वेटा ( कपुर दा ) यांच्या स्मरणार्थ श्री कुलदैवत कुटुंबीय क्रिकेट स्पर्धा - होळी चषक २०२५ स्पर्धेचे सलग ७ व्यांदा सहयोग मित्र मंडळ आणी प्रयुक्ता मित्र मंडळाच्या आयोजनाने प्रवेश फ्री विना मुल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी ही स्पर्धा india crick ह्या वाहीणीवर live ठेवण्यात आली आहे.या स्पर्धेत कोपर खैरणे गावातील सर्व कुलदैवत कुटुंबीयातील खेळाडु खेळणार आहेत.प्रत्येक कुटुंबीय क्रिकेट संघातील ११ खेळाडु मध्ये ५०+२ खेळाडु खेळणार आहेत.या स्पर्धेचे पारितोषिक खास करून विजेत्या कुलदैवत कुटुंबीय आणी उपविजेता कुलदैवत कुटुंबीय यांना आकर्षक चषक व बोकड ( बकरा )तसेच तृतीय क्रमांकासाठी आकर्षक चषक आणी ६ कोबंड्या ही कुटुबियांना देण्यात येणार आहे.अश्या प्रकारे ही स्पर्धा कोपरखैरणे गावातील सेक्टर -२३ येथील भुमि पुत्र मैदान येथे येत्या १२ मार्च रोजी बुधवारी ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.
या स्पर्धेचे आयोजन श्री.राजेश लालचंद वेटा ( रेडमून ), श्री.विजय बाळाराम म्हात्रे, श्री.जय बाळाराम म्हात्रे, श्री.चंद्रकांत पाटील, आणी श्री.विनय वेटा यांनी आयोजन केले आहे.या स्पर्धेत टोटल १२ संघ खेळवले जाणार आहे.प्रत्येक सामना ३ षटकांचा राहील या स्पर्धेमध्ये १४४ खेळाडु आपले नशीब अजमवणार आहेत.ही स्पर्धा व्यवस्थित पार पडावी म्हणून श्रीनिवास पाटील, दिलीप पाटील , योगेश म्हात्रे,आणी राकेश वेटा आदी खेळाडु मेहनत घेत आहेत .असे कोपर खैरणे गावातील क्रिकेट प्रेमी अविनाश भरत पाटील यांनी अशी माहिती दिली.