डोंबिवली मोठागाव जलवाहतुक प्रकल्पाच्या कामाला सुरुवात
डोंबिवली ( शंकर जाधव ) : रो-रो बोटसाठी पाण्यावरील स्थानक ( जेट्टीच्या ) कामाला सुरुवात होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी डोंबिवली पश्चिनमेकडील रेती बंदर रोडखाडीलगत 19 तारखेला या कामाचे श्रीफळ वाढवून भूमिपूजन केले.यावेळी दीपेश म्हात्रे म्हणाले, २०१८ मध्ये आम्ही रो-रो बोट मार्गाची पाहणी केली होती आणि त्या दिवसापासून या प्रकल्पासाठी सतत पाठपुरावा सुरू होता . महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून या कामासाठी १००० कोटी रुपयांचा डी.पी.आर. तयार करण्यात आला होता. त्यातील प्राथमिक स्वरूपात ८० कोटी रुपये मंजूर झाले आहेत . यामधील डोंबिवली मोठागाव जेट्टी करीता २२ कोटी रुपये मंजूर होऊन त्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या रो-रो सेवा च्या माध्यमातून प्रवाशांना डोंबिवलीहून वसई, विरार, मुंबई आणि नवी मुंबईपर्यंतचा प्रवास त्यांच्या वाहनांसह रो-रो बोटीने करता येईल, यामुळे नागरिकांच्या वेळेची व इंधन खर्चाची बचत होणार आहे.
पुढे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे म्हणाले, हा जलवाहतुकीचा मार्ग असणार आहे. हा आता सध्या तरी तात्पुरता मोठागाव ते ठाणे, ठाणे ते वसई- विरार मीरा-भाईंदर असा हा रूट असणार आहे. या जेटी झाल्यानंतर इथून थेट वाहन त्या रो रो मध्ये टाकून ती वसई विरार पर्यंत नेऊ शकाल अशी ही व्यवस्था आहे.भविष्य काळामध्ये हीच रोरो डोंबिवली ते नवी मुंबई एअरपोर्ट अशी जाण्याची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी आमचा देखील प्रयत्न आणि शासनाचा देखील मानस आहे की इथून जे टी च्या माध्यमातून थेट जलवाहतूक ही नवी मुंबई एअरपोर्ट म्हणजे डोंबिवलीकरांना 20 मिनिटांमध्ये आपली गाडी घेऊन नवी मुंबई विमानतळ पर्यंत नेता येईल. 2018 ला जेव्हा आमचा पक्ष एकसंघ होता तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या बरोबर आम्ही एका जलमार्गाची पाहणी केली होती. त्याच्यानंतर याचा डीपीआर बनवला गेला. त्याच्यानंतर नितीन गडकरी यांच्याकडे पार पडलेल्या बैठकीत हा जलमार्ग मंजूर झाला होता आणि त्याच्यासाठी ठाणे महानगरपालिकेला 1000 कोटीचा निधी देखील मिळाला होता.आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो की जलवाहतूक डोंबिवलीतन सुरु व्हावी. मोठा गाव मानकोली ब्रिजचं जे डिझाईनिंग आहे ते स्पेशली जलमार्गासाठी डिझाईन केलेला आहे. जलवाहतूक सोपी व्हावी यासाठी डिझाईन केलेला आहे आणि भविष्यात कधी ना कधी जलवाहतूक सुरु होईल असा आम्हाला देखील अंदाज होता आणि मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या शंभर दिवसाच्या आत्ताचे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पहिल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये हा जलवतुकीचा मार्ग आहे की त्यांचा देखील खूप खूप आभार मानतो. त्यांनी डोंबिवलीकरांसाठी एक ही मोठी सेवा उपलब्ध करून दिलेली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांच्या माध्यमातून आज जलमार्गाची आणि याची सुरुवात देखील होते.या जलमार्गाकरता कल्याण लोकसभा मतदार संघांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा देखील पाठपुरा होता. परंतु त्याच्यानंतर कोविड आलं कोविड नंतर ते सगळं काम बारगळलं होतं.परंतु आता ते कामाला सुरुवात केलेली आहे. या कामामुळे मोठ्या प्रमाणात स्थानिकांना रोजगार निर्मिती देखील होतील. मोठ्या गावाच्या या जीटीच्या ठिकाणी तिकीट घर व मार्केट स्टेशन होणार आहे.
मुंबईपर्यंत जाण्यासाठी नवीन मार्ग इथून जलवाहतुकीच्या माध्यमातून सुरु होणार याचा कालावधी 18 महिने आहे.18 महिने जीटीच काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.येत्या दोन वर्षांमध्ये इथून आपण गाडी घेऊन मुंबईकडे रोरोच्या माध्यमातून जाऊ शकू अशी व्यवस्था तयार होईल असा आम्हाला अंदाज आहे.बोर्डाच्या माध्यमातून सध्या जे पाण्यातला जे काम आहे ते मेरिटाइल बोर्डाच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि त्याच्या वरच जे इथलं पार्किंग किंवा तिकीट घर आहे याचं काम पोस्टगार्डच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या सगळ्या दोन्ही एजन्सीच्या माध्यमातून हे काम होणार आहे. आता सध्या 80 कोटी मंजूर झालेले आहेत आणि त्यातले मोठा गाव जेटीसाठी 22 कोटी रुपये मंजूर झालेला आहे.