दिवा:- आपले महानगर ठाणे आयकॉन 2025 पुरस्कार शनिवारी सायंकाळी ठाणे पश्चिम येथील सीकेपी हॉल खारकर आली येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
यावेळी विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान गुणवंत व्यक्तीचा शाळ सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला ठाणे शहर आमदार संजय केळकर यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले.
रोहिदास मुंडे ने सांगितले की, पंचवीस वर्षे राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम केलेल्या कामाची दखल आपले महानगर यांनी घेऊन मला ठाणे आयकॉन 2025 पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल आपले महानगर चे संपादक संजय सावंत व ठाणे आवृत्तीचे ब्युरो चीफ अमोल कदम यांचे मनस्वी आभार व्यक्त करताना रोहिदास मुंडे यांनी हा पुरस्कार माझा नसून संपूर्ण दिवा वाशियाना आहे असे मुंडे यांनी सांगितले.